Nashik मध्ये एका 'ATM'वर चोरट्यांनी असा मारला डल्ला | Lokmat News

2021-09-13 418

नाशिक : नाशिकरोड परिसरातील जेलरोड येथील एटीएम मधून सुमारे १३ लाख रुपयांची रोकड लंपास केल्यानंतर साधारणपणे पाऊण तासाच्या अंतराने मखमलाबाद गावातील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे ३२ लाख रुपयांची रोकड लंपास केल्यामुळे शहरातील एटीएमच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना या दोन्ही घटनेत एटीएम फोडणाºया संशयितांविषयी महत्वाचे धागेदोरे पोलिसांची हाती लागले आहेत. एटीएमच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयात संशयितांच्या हालचाली कैद झाल्याने त्यांची चेहरेपट्टी जुळली असून त्यावरून दोन्ही एटीएम फोडणारी टोळी एकच असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे.
जेलरोड परीसरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्टेट बँकेचे एटीएमफोडल्यानंतर अवघ्या पाऊण तासाच्या अंतराने गुरुवारी पहाटेच्या सुमारास मखमलाबाद गावातील स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रावर दरोडा टाकत चार ते पाच जणांच्या टोळीने गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापून ३१ लाख ७५ हजार९०० रुपयांची रोकड हातोहात लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने शहरातील एटीएमच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या प्रकारानंतर पोलिस अधिकाºयांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात पहाटेच्या सुमारास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे बीट मार्शल कर्मचारी दुचाकीवरून रस्त्याने जात असतानाचे दिसून आले तर अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने संशयित चारचाकी वाहनात आल्याचे दिसले त्यातील काहींनी एटीएम केंद्रात धाव घेतली एकाने शटर खाली लावले. त्यानंतर अवघ्या दहा ते बारा मिनिटांच्या कालावधीत एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने कापून त्यातील रोकड घेऊन संशयित पसार झाल्याचे सीसीटीव्हीतून दिसून येत असून जेलरोड आणि मखमलाबाद गावातील एटीएम फोडणारे संशयित आरोपी एकाच टोळीतील असल्याचा संशय त्यांच्या हालचाली आणि चेहरेपट्टीवरून पोलिसांनी व्यक्त केला आहे.


आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Nashik
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19